‘रेलवन’ ॲपवरून तिकीट काढा आणि मिळवा ३ टक्के सवलत; १ मार्चपासून जुने ‘यूटीएस’ ॲप होणार बंद

रत्नागिरी: रेल्वेने डिजिटल तिकिटिंगला चालना देण्यासाठी आणि तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘रेलवन’ (RailOne) या मोबाईल ॲपवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दरात ३ टक्के सवलत दिली जाणार आहे.

  • कोणाला मिळणार सवलत?: ही सवलत जनरल म्हणजेच सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना लागू असेल.
  • ॲपची उपलब्धता: ही सुविधा रेल्वेच्या ‘यूटीएस’ (UTS) तसेच नवीन ‘रेलवन’ ॲपवर उपलब्ध आहे.
  • महत्वाची तारीख: रेल्वेने ‘रेलवन’ हे अद्ययावत ॲप सादर केल्याने, जुने असलेले ‘यूटीएस’ ॲप येत्या १ मार्चपासून बंद केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 17-02-2026