रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरीतील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘पादुका परिक्रमा पालखी सोहळा’ आज रत्नागिरी शहरात दाखल होत आहे. नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात या पालखीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्याचे वेळापत्रक:
बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६:
- आगमन: सायंकाळी ५:०० वाजता (श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नाचणे).
- महाआरती: सायंकाळी ७:०० वाजता.
- दर्शन: आरतीनंतर सर्व भाविकांसाठी दर्शन सोहळा सुरू होईल.
गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६:
- अभिषेक: पहाटे ५:३० ते ६:०० या वेळेत पादुकांवर अभिषेक केला जाईल.
- दर्शन: सकाळी ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत भाविकांना पुन्हा दर्शनाचा लाभ घेता येईल.
भाविकांसाठी विशेष सूचना आणि आवाहन
रत्नागिरी केंद्राच्या वतीने सर्व सभासद, सेवेकरी आणि स्वामी भक्तांना या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी भाविकांना खालीलप्रमाणे विनंती करण्यात आली आहे:
१. प्रसाद सेवा: बुधवारी सायंकाळी येताना ‘मांदियाळी’साठी सुकी भाजी आणि पोळी सोबत आणावी. २. अभिषेक सेवा: गुरुवारी सकाळी अभिषेकासाठी येताना भाविकांनी दूध आणि केळी घेऊन यावीत.
“अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाची ही पादुका परिक्रमा भक्तांच्या दारी येत असून, रत्नागिरीतील स्वामी भक्तांनी या दर्शनाचा आणि सेवेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन स्थानिक केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 18-02-2026














