मंडणगड : दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेली आहे. महिनाअखेर असतानाही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसून येत आहे.
दिवाळीसाठी लागणारे फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, उटणे, रोषणाईच्या वस्तू, कपडे, फराळ यांची मागणी लक्षात घेऊन शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने या वस्तूंनी भरलेली दिसून येत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रात परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे गावागावांतील बालगोपाळ सध्या किल्ले बनवण्यात व्यस्त आहेत.
बच्चे कंपनीत सणाबद्दल अलोट उत्साह दिसून येत असला तरी महिनाअखेरीस सण आल्याने सणाचे खर्चाचे बजेट जुळविताना पालकवर्गाची मात्र मोठी दमछाक होत आहे.
असे असले तरी पुढील दिवसांत बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होणार असून, यामुळे अर्थकारणास गती मिळेल, असे बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 30/Oct/2024














