रत्नागिरी : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट दिली. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी संतोष थेराडे यांचा यथोचित सन्मान केला.
जिल्हा परिषद प्राप्त केलेल्या दणदणीत विजयानिमित्ताने त्यांचे अभिनंदन करताना जनतेमधील नेत्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला मतदारांनी दिलेला हा कौल म्हणावा लागेल. या विजयामुळे संतोष थेराडे यांनी जनसामान्यांमधील आपले स्थान अधोरेखित केले. त्यांच्या दणदणीत विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मनस्वी आनंद होतो असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
राजकारणा पलीकडे जाऊन मैत्रीचे धागे जपावे लागतात. आमची मैत्री अनेक वर्षांची आहे. राजकारणातील भूमिका भिन्न असल्या तरी वैयक्तिक स्नेहाची भावना कधीच विरळ होणार नाही. निवडणूक संपली, आता राजकीय संघर्ष संपला. आता निखळ मैत्री जपत पुढे जाऊ असे भावोद्गार ॲड.दीपक पटवर्धन यांनी काढले व संतोष थेराडे यांच्या नव्या इनिंगसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 19-02-2026














