रत्नागिरीत विजेच्या लहरीपणामुळे नागरिकांना फटका; ओव्हरलोडमुळे घरगुती उपकरणे जळून खाक

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील नाचणे परिसरातील सुपलवाडी, पिंपळवाडी आणि गुरूमळी येथे महावितरणच्या विजेच्या ओव्हरलोडमुळे (High Voltage) अनेक घरांतील विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अचानक वाढलेल्या दाबाुळे घरातील फ्रिज, टीव्ही, पाण्याचे पंप, कुलर, वायफाय मशीन, चार्जर आणि बल्ब यांसारखी महागडी उपकरणे निकामी झाली आहेत. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. भविष्यकाळात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 19-02-2026