संगमेश्वरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘रूटमार्च’

देवरूख : विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी संगमेश्वर पोलिस व सीआयएसएफ जवानांच्या वतीने तालुक्यातील कोंडीवरे गावात पथसंचलन (रूटमार्च) करण्यात आले. यावेळी पोलिसांनी नागरिकांना निवडणूक कालावधीत शांतता राखण्याचे आवाहन केले.

संगमेश्वर पोलिस व सीआयएसएफ जवानांच्या वतीने पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच कोंडीवरे गावात पथसंचलन करण्यात आले. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करून दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, अशा यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन संगमेश्वर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर असून, पोलिसांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील कोंडीवरे होते.

गावातील ग्रामपंचायत येथून पोलिस पथसंचलनास सुरुवात करून मोहल्ला, बौद्धवाडी आदी मागनि गावात पोलिसांनी केलेल्या पथसंचलनाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून आली. पथसंचलनात सीआयएसएफचे अधिकारी व ४८ अंमलदार व स्थानिक पोलिस ठाणे एक अधिकारी, १५ अंमलदार असे एकूण २ अधिकारी व ६५ कर्मचारी सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 30/Oct/2024