रत्नागिरी (प्रतिनिधी): शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता १० मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक:
- ऑनलाईन अर्ज: १० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.
- बँकेत चलन भरणे: बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी १३ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- संपर्क कार्यालय: अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी कार्यालयाशी (शिक्षक सह. पतपेढी इमारत, मजगांव रोड) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी इच्छुक उमेदवारांना या मुदतवाढीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अर्ज भरताना रत्नागिरी केंद्राची नोंद घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 21-02-2026














