बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जनता सहकारी बँकेत ६० लिपिक पदांसाठी भरती सुरू; पदवीधरांनी त्वरित करा अर्ज

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जनता सहकारी बँक लि; सातारा यांच्यामार्फत ‘लिपिक’ (Clerk) पदाच्या ६० रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना २ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

भरतीचा थोडक्यात तपशील

बाबीमाहिती
बँकेचे नावजनता सहकारी बँक लि; सातारा
पदाचे नावलिपिक (Clerk)
एकूण जागा६० पदे
नोकरी ठिकाणसातारा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
अंतिम तारीख२ मार्च २०२६

पात्रता आणि वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

२. संगणक ज्ञान: उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्सचे प्रमाणपत्र असावे.

३. भाषा ज्ञान: मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.

४. वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.

कोणाला मिळणार प्राधान्य?

  • ज्या उमेदवारांना सहकारी बँक किंवा वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा कामाचा अनुभव आहे.
  • JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेची (ICM, IIBF इ.) बँकिंग/सहकार कायदेविषयक पदविका असलेल्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल:

  • परीक्षा स्वरूप: परीक्षा १०० गुणांची आणि बहुपर्यायी (MCQ) असेल.
  • कालावधी: परीक्षेसाठी १२० मिनिटे (२ तास) वेळ दिला जाईल.
  • निवड: ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना बँकेमार्फत तोंडी मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज शुल्क आणि अर्ज कसा करावा?

  • अर्ज शुल्क: या भरतीसाठी १,१८० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
  • कसा करावा अर्ज: उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आजची तारीख लक्षात घेता अर्ज करण्यासाठी आता कमी वेळ शिल्लक असल्याने पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित अर्ज करणे हिताचे ठरेल.

महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: सुरू आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ मार्च २०२६.