मेष – साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
वृषभ – आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल.
मिथुन – आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल.
कर्क – कुटुंबियांशी वाद होतील. दुपार नंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती होईल.
सिंह – आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा होईल.
कन्या – आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. सामाजिक मान – प्रतिष्ठेत वाढ होईल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
तूळ – मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
वृश्चिक – दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी – व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. मित्रांकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपले विचार प्रगल्भ होतील.
धनु – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पदोन्नती संभवते. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
मकर – आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
कुंभ – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. स्फूर्ती व प्रसन्नतेचा अभाव जाणवेल.
मीन – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 04-03-2026













