आजचे राशीभविष्य, २ मार्च २०२६

मेष – आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल.

वृषभ – विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान – सन्मान संभवतात.

दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिथुन – मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न राहील.

Amey jwelrs

कर्क – आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. अवैध प्रवृत्तीमुळे मन भ्रष्ट होऊ नये ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह – आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल.

कन्या – आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील.

तूळ – घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक– आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते.

धनु – आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. अचानक धन प्राप्ती संभवते.

मकर – आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल.

कुंभ – आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल.

मीन – आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 02-03-2026