दापोलीत घरात गांजा ओढताना एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

दापोली:
दापोली तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे राहत्या घरात गांजाचे सेवन करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. राजेंद्र अनंत घाग असे या अटक करण्यात आलेल्या मजुरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी बळीराम चोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ मार्च रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पोलिसांनी संशयावरून घाग यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी ते गांजा ओढत असताना मिळून आले. त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८(क) आणि २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यसनावर या कारवाईमुळे जरब बसणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-03-2026