लांजा आणि राजापुरात दारूविक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई; ८२ वर्षीय वृद्धेसह अनेकांवर गुन्हे

लांजा/राजापूर:
रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री विरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून लांजा आणि राजापूर परिसरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे, राजापूरच्या जुवाठी कोष्टेवाडी येथे चिन्याच्या ढिगाऱ्यामागे लपून दारू विकणाऱ्या ८२ वर्षीय वृद्धेवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

लक्ष्मी शांताराम गुरसाळे (वय ८२) या वृद्धेकडून पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. दुसरीकडे, लांजा पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या रियाज शेख, शंकर गोस्ले आणि जाहीद काझी यांना ताब्यात घेतले. तसेच कोचरी सुतारवाडी आणि कोल्हेवाडी येथे हातभट्टी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या सुरेश दळवी आणि दीपाली सावंत यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-03-2026