चिपळूण:
चिपळूण शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्ध चिपळूण पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.
चिंचनाका एसटी स्टँड रोडवर मनोहर लॉजसमोर टाटा मॅजिक (क्रमांक MH-50-A-1637) उभी करून रस्ता अडवणाऱ्या लियाकत सालेखान खान (वय ४८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बहादुरशेख नाक्यावर कोकणदिप सुपर मार्केट समोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा (क्रमांक MH-08-AQ-7492) लावून निघून गेलेल्या नरेश रामचंद्र गुहागरकर याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा वाहन चालकांवर बीएनएस कलम २८५ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 05-03-2026













