रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासांत चार वेगवेगळ्या घटनांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दापोली, जयगड आणि राजापूर परिसरात या घटना घडल्या आहेत.
दापोलीतील लाडघर येथील एका हॉटेलच्या जिन्यावरून पडून सद्दाम यासीन मुरुडकर (वय ३४) या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, मालाड (मुंबई) येथील रहिवासी रत्नकांत राजाराम माने (वय ५५) यांना घाम येऊन त्रास सुरू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.जयगड परिसरात वाटद खंडाळा येथे बागायती मजुरी करणाऱ्या हरीराम चव्हाण (वय ६०) यांचा छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाला. तर राजापूरच्या विखारेगोठणे येथे मूळच्या नेपाळमधील रहिवासी असलेल्या नारायण दोवारी थारू (वय ५०) यांचा झोपेतच मृत्यू झाला.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 05-03-2026













