◼️ शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा सन्मान
रत्नागिरी : दै. लोकसत्ता च्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला.
शुक्रवार 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबई येथील द ताज बाय विवांता कफ परेड येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग हे देखील उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 18-03-2026














