चिपळूणमध्ये १२ एप्रिलपासून राज्यस्तरीय सीजन बॉल क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे १२ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत राज्यस्तरीय सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथशेठ दाभोळकर यांनी दिली.

ही स्पर्धा चिपळूण पालिकेच्या पवन तलाव मैदानावर होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ७७,७७७ रुपये, उपविजेत्या संघाला ५५,५५५ रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी १५,००० रुपये व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत.

स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून प्रत्येक सामना २० षटकांचा होईल. प्रत्येक संघामध्ये महाराष्ट्रातील चार आयकॉन खेळाडू असणार आहेत.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. तसेच उद्घाटन आणि समारोप समारंभासाठी भारतीय तसेच रणजी खेळाडू उपस्थित राहणार असल्याचेही दशरथ दाभोळकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 18-03-2026