लांजा (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घृणास्पद घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विधीसंघर्षित मुलाने बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराशेजारी खेळत असताना घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित बालिका आपल्या घराशेजारी खेळत असताना, आरोपी विधीसंघर्षित मुलाने तिला घरामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या गंभीर प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच पीडित कुटुंबाने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. लांजा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
गुन्हा दाखल आणि तपास
लांजा पोलीस ठाण्यात आरोपीवर भारतीय दंड संहिता (भादंवि) कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजात संताप व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 25-03-2026














