मेष – आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक व कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल.
दुपार नंतर मात्र चिंता वाढतील व त्यामुळे उत्साह कमी होईल.
वृषभ – महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील व त्यामुळे आलेली एखादी संधी हातून निसटेल.
मिथुन – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क – आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.
सिंह – आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार – व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. एखाद्या स्त्रीमुळे लाभ होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी – व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल.
तूळ – कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.
वृश्चिक – आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील.
धनु – आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. परदेशस्थ नातेवाईकांकडून काही आनंददायी बातम्या येतील.
मकर –आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. स्त्रियांना माहेर कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
कुंभ – आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. प्रकुतीची काळजी घ्यावी लागेल.
मीन – आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 25-03-2026














