मुंबई : राज्यात सध्या आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदलीचा (Transfer) सपाटा सुरू असून काही दिवसांपूर्वीच 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव तुकाराम मुंढे यांची देखील बदली करण्यात आली होती, त्यासंह अनेक जिल्हाधिकाऱ्यांचे खांदेपालटही केल्याचं दिसून आलं.
त्यात, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या कलेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता, सामान्य प्रशासन विभागाकडून आणखी 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
राहुल रंजन महिवाल (आयएएस:आरआर:2005), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव पदावर बदली करण्यात आली आहे. तर, श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:2009) यांची विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांसह आणखी बड्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पोस्टींग देण्यात आलं आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
1. राहुल रंजन महिवाल (आयएएस:आरआर:2005), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
2. श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:2009) यांची विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.
3. रुचेश जयवंशी (आयएएस:आरआर:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
4. कन्हूराज बागटे (आयएएस:एससीएस:2011) यांची सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, कल्याण येथे बदली करण्यात आली आहे.
5. लक्ष्मण राऊत (आयएएस:एससीएस:2015), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
6. गीतांजली बाविस्कर (आयएएस:एससीएस:2015), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
7. डॉ. दिलीप जगदाळे (आयएएस:एससीएस:2015), सह व्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, कल्याण यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
8. पंकज देवरे (आयएएस:एससीएस:2016) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे बदली झाली आहे.
9. मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. करिश्मा नायर (IAS:RR:2021) अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
11. अमित रंजन (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 08-04-2026











