Pakistan Roosevelt Hotel Deal with Trump: अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या वातावरणात पाकिस्तान अचानक ‘मध्यस्थ’ म्हणून कसा काय पुढे आला, या प्रश्नाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, आता यामागे एक धक्कादायक व्यापारी व्यवहार (Business Deal) असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील एका ऐतिहासिक हॉटेलची ऑफर देऊन ही मध्यस्थी मिळवल्याचा दावा केला जात आहे.
काय आहे ‘रुझवेल्ट हॉटेल’चे प्रकरण?
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये पाकिस्तान सरकारची अत्यंत मौल्यवान मालमत्ता आहे, ती म्हणजे ‘रुझवेल्ट हॉटेल’.
- इतिहास: १९२४ मध्ये बांधलेले हे ऐतिहासिक हॉटेल १००० खोल्यांचे आहे.
- किंमत: या हॉटेलची अंदाजित किंमत सुमारे ८,३०० कोटी रुपये आहे.
- सद्यस्थिती: कोरोना काळात बंद पडलेले हे हॉटेल आता अमेरिका आणि पाकिस्तान मिळून विकसित करणार आहेत.
ट्रम्प यांचा ‘बिझनेस माईंड’ आणि मुनीर यांचा ‘स्वार्थ’
अहवालानुसार, जनरल आसिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यावसायिक वृत्तीचा फायदा घेतला. ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही युद्ध आणि शस्त्रास्त्र विक्रीतून नफा कमावल्याचे आरोप झाले आहेत. आता न्यूयॉर्कमधील या आलिशान हॉटेलमध्ये भागीदारी मिळवून ट्रम्प यांनी मोठा आर्थिक फायदा करून घेतल्याची चर्चा आहे. त्या बदल्यात त्यांनी पाकिस्तानला या मोठ्या आंतरराष्ट्रीय संघर्षात ‘मध्यस्थ’ म्हणून स्थान दिले.
सरकारी संपत्ती पणाला, पण श्रेय चीनला?
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर ढासळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी जनरल मुनीर यांनी चक्क सरकारी संपत्तीच पणाला लावली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी स्वतः मान्य केले आहे की इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यात चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. असे असतानाही, केवळ हॉटेल डीलमुळे पाकिस्तानला मध्यस्थीचे ‘टॅग’ मिळाले असल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रतिमेसाठी तिजोरीवर डल्ला?
जनरल मुनीर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आणि लष्कराचे वर्चस्व टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या तिजोरीवर डल्ला मारत ही ‘हॉटेल डील’ फत्ते केल्याची टीका आता होत आहे. एका बाजूला देश आर्थिक संकटात असताना, लष्करप्रमुखांनी अशा प्रकारे सरकारी मालमत्तेचा सौदा करणे हे पाकिस्तानमध्ये वादाचे केंद्र बनले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 08-04-2026











