रत्नागिरी: आयबीएस कम्प्युटर्स आयोजित ‘आयबीएस कम्प्युटर प्रीमियर लीग २०२६’ (ICPL) अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘आयबीएस क्लाऊड चॅलेंजर्स’ आणि ‘सायबर वॉरियर्स’ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात ‘आयबीएस क्लाऊड चॅलेंजर्स’ संघाने वर्चस्व गाजवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत क्लाऊड चॅलेंजर्स, सायबर वॉरियर्स, हॅकर्स आणि टेक् टायटन्स असे एकूण ४ संघ सहभागी झाले होते. यामध्ये रत्नागिरीतील ३ आणि आयबीएस कम्प्युटर्स देवरुख केंद्राचा १ संघ अशा करिअर प्रोग्रामनुसार विभागलेल्या संघांनी आपला क्रीडाप्रकार सादर केला.
विजेत्या संघाचे शिलेदार:
कर्णधार तन्वी कर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली सोनल रसाळ, कांचन बाविस्कर, अथर्व शेट्ये, तनिष सुर्वे, साक्षी फोंडेकर, अमित आंबेरकर आणि झिया खान यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तर उपविजेत्या सायबर वॉरियर्स संघात सोहम गवाणकर, राहुल नाटेकर, आर्ची शेट्ये, मैथिली बने, राज आंबेकर, देवयानी मोर्डेकर आणि साहिल आखाडे यांचा समावेश होता.
स्पर्धेतील वैयक्तिक गौरव:
मॅन ऑफ द सिरीज व बेस्ट बॅट्समन: अथर्व शेट्ये
बेस्ट बोलर: मैथिली बने
बेस्ट फिल्डर: आदित्य पोकळे
मॅन ऑफ द मॅच: सोहम गवाणकर, शुभम मोहिते, लक्ष्मी पेंढारी, आर्ची शेट्ये, अथर्व शेट्ये, तोमर भाटे.
विजेत्या संघाला आयबीएस कम्प्युटर्सचे संस्थापक प्रेरणा अमित नागवेकर आणि ॲड. अमित नागवेकर यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी आयबीएस कम्प्युटर्स देवरुख केंद्राचे प्रमुख ॲड. सरताज कापडी, सारा कापडी आणि चिपळूण केंद्राचे राजेश चव्हाण उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंच्या खेळाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
आयबीएस कम्प्युटरच्या करिअर प्रोग्रामला ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो, त्याचप्रमाणे या क्रीडा स्पर्धेलाही विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 13-04-2026













