Nana Patole on Devendra Fadnavis : राहुल गांधी (Rahul Gandhi) हे स्वतःच्या अस्तितावासाठी नाही तर भारताच्या जनतेच्या अस्तित्वाची आणि संविधानासाठी लढाई लढत आहेत, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रपूर येथील एका कार्यक्रमा दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात एक व्यक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांचा पराभव हा लोकांमुळे नाही तर निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे होत असल्याची टीका केली. भाजप जनतेचे मत चोरून बेइमानीन निवडून येत आहे. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळेच असल्याची गंभीर टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली आहे.
पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडणूक देण्याच्या परंपरेला भाजपनं ब्रेक लावला
महाराष्ट्रात ज्या काही पोटनिवडणुका झाल्या, त्यासाठी काँग्रेस पक्षानं बिनविरोध निवडून देण्याची परंपरा सुरू केली. पण, तिला ब्रेक करण्याचं काम भाजपनं केल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्यामुळेच मधल्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या काँग्रेसला लढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला जे पक्षाचे लोक गृहीत धरून चालतात त्यामुळेच आम्ही पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरला होता. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री असतील, शरद पवार असतील, सुरेंद्र पवार असतील या सर्वांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे साहेबांना विनंती केली. त्यानंतर काँग्रेस पक्षांन आपला उमेदवार मागे घेतला. बारामती पोटनिवडणुकीत सुरेत्रा पवारच निवडून येतील असं चित्र असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
निवडणूक आयोग हा नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा चपराशी
निवडणूक आयोग नरेंद्र मोदींचा चपराशी आहे. आम्ही याबाबत अनेकदा टीका केली. मात्र, आयोगाला काही वाटत नाही. सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहे. एसआयआर मध्ये निवडणूक आयोग दलित, मुस्लिमांचे वोट कमी करीत आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतदार कमी करीत आहे….हा कोणता लोकतंत्र आहे? जे जिवंत आहेत, जे दिया देशाचे नागरिक आहेत त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. 90 लाख मतदार पश्चिम बंगालमध्ये कमी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आता नरेंद्र मोदी आहे. त्याच्यामुळे मी चॅलेंज करतो एक वेळेस यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. राहुल गांधींची लोकप्रियता काय आहे त्यांना देशातील जनता कसे मतदान करतील हे त्यातून सिद्ध होईल. निवडणूक आयोग लोकतंत्रची रोज हत्या करत आहेत, त्याच उत्तर त्यांना द्यावं लागेल, अशी खरमरीत टीका नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 13-04-2026












