सिंधुदुर्ग : गगनबावड्यात जोरदार पाऊस, भुईबावडा घाटात दरड कोसळली; 16 तासांपासून वाहतूक बंद

सिंधुदुर्ग : नैऋत्य मोसमी पावसाची आता देशाच्या उत्तरेकडून माघार होत असून राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून पावसानं एक्सीट घेतली आहे. दरम्यान, राज्यातूनही पाऊस माघारी फिरण्याच्या मार्गावर असून परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, गोव्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

या आठवड्यात राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम सरींची हजेरी रहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आज २४ ते २७ सप्टेंबरपर्यंत मध्य भारताता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे राज्यात कोकणाला परतीच्या पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढल्याचे चित्र आहे.

परिणामी, सिंधुदुर्गातील वैभववाडीत भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने गेल्या 16 तासांपासून वाहतूक बंद असल्याची माहिती आहे.

ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका भुईबावडा घाटाला बसला असून मुसळधार पावसामुळे भली मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने भुईबावडा घाटातील वाहतूक बंद झाली आहे.

अजूनही ४ ते ५ तास भुईबावडा घाटातील दरड बाजूला करण्यासाठी लागणार असल्याने सध्या कोल्हापूर वरून सिंधुदुर्गात येणारी वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविली असल्याची माहिती पुढे आली आहे.

भुईबावडा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर दोन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली.

काल सायंकाळी वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाट परिसरात ढगफूटीसदृष्य पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे घाटात दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या त्यामुळे रात्रीपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळ पासून घाटातील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 24-09-2024