MPSC 2026: राज्य सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

पुणे : राज्य लाेकसेवा आयाेगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२५ चा निकाल २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे. आता मुख्य परीक्षेसाठी एकूण १३९ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याची आणि ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची मुदत १४ मार्च २०२६ रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत १६ मार्च रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १७ मार्च रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी याची नाेंद घ्यावी, असेही राज्य लाेकसेवा आयाेगाने म्हटले आहे.

दरम्यान, विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात १८ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पुढे अतिरिक्त मागणी विचारात घेऊन राज्य आयाेगाने ८ जानेवारी आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार पूर्वपरीक्षा झाली आणि त्याचा निकालही प्रसिद्ध झाला. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान पार पडणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल, असे आयाेगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

नियाेजित वेळापत्रक

Tata safari

दिनांक : सकाळचे सत्र (विषय) आणि दुपारचे सत्र (विषय)

२९ मार्च : भाषा पेपर-१ : भाषा पेपर-२
५ एप्रिल : निबंध, पेपर-३

१८ एप्रिल : सामान्य अध्ययन -१, पेपर-४ : सामान्य अध्ययन-२, पेपर-५
१९ एप्रिल : सामान्य अध्ययन-३, पेपर-६ : सामान्य अध्ययन-४, पेपर-७

२६ एप्रिल : वैकल्पिक विषय, पेपर- ८ : वैकल्पिक विषय, पेपर – ९

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:15 04-03-2026