रणवीर आणि दीपिकानं लाडक्या लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव

Ranveer Dipika Baby Girl Name : बॉलिवूडचं (Bollywood) सर्वात फेवरेट कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) यांच्या आयुष्यात 8 सप्टेंबर 2024 रोजी एका गोड पाहुणीची आगमन झालं.

दोघांनीही सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. अशातच आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दीपवीरनं आपल्या चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिलं आहे. दोघांनी आपल्या चिमुकलीचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. दोघांनीही लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर आपल्या घरी आलेल्या चिमुकलीचं नाव शेअर केलं आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

दीपिका आणि रणवीरसाठी यंदाची दिवाळी अत्यंत खास आहे. कारण यंदा त्यांच्या गोंडस चिमुकलीची पहिली दिवाळी आहे. आज लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलीचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. दुआ पादुकोण सिंह (Dua Padukone Singh) असं दीपवीरनं आपल्या गोंडस चिमुकलीचं नाव ठेवलं आहे. दोघांनी सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर मुलीचं नाव जाहीर करताना दीपवीरनं एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपवीरच्या गोंडस बाळाची चिमुकली पावलं दिसत आहेत. त्यासोबत कॅप्शनमध्ये दोघांनी बाळाचं नाव जाहीर केलं आहे.