आजचे राशीभविष्य, १४ मार्च २०२६

मेष – हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

वृषभ – हा महिना तुमच्यासाठी आनंददायी आणि प्रगतीशील राहील.

तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला विविध स्तरांकडून पाठिंबा मिळेल.

मिथुन – कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल.

कर्क – आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल.

सिंह – पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल.

कन्या – आज शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत.

तूळ – गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. मानहानी संभवते.

वृश्चिक – आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल.

धनु – एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील.

मकर – आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा.

कुंभ – सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल.

मीन – आजचा दिवस लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 14-03-2026