रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गजांच्या प्रचार सभा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत ५ नोव्हेंबरला जाहीर सभा होणार आहे.
शहरातील जलतरण तलावासमोरील मैदानावर सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे ९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चिपळूण येथे जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्यास सुरवात होणार आहे.
जिल्ह्यात महाविकास आघाडीने पाच जगांवार पाच उमेदवार दिले आहेत. या पाच जागांपैकी चिपळुणची एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यात आली आहे. उर्वरित चार जागा शिवसेना (उबाठा) लढणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बाळ माने हे उबाठा शिवसेनेचे उमेदवार आहेत. माने यांना उमेदवारी दिल्याने अनेक निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे ही नाराजी दूर करून पक्षादेशाचे पालन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरला रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा समान आहे. शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव रिंगणात आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी शरद पवार ९ नोव्हेंबरला चिपळूणमध्ये येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 04/Nov/2024














