मशाल चिन्ह मतदारांच्या घरा-घरात पोहोचवा : अजित यशवंतराव

लांजा : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजन साळवी यांचे प्रामाणिक काम करून त्यांना विजयी करणे, हेच माझे ध्येय आहे. साळवी यांना विजयी करून आणणारच, असा शब्दही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती शिवसेना नेते अजित यशवंतराव यांनी सांगितले. पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारून पक्षात प्रवेश केला आहे.

एक शिवसैनिक म्हणून लांजा राजापूर मतदारसंघात काम करत आहे. माझ्या सर्व कार्यकर्ते यांना सांगितले आहे की, जास्तीत जास्त मतदान डॉ. राजन साळवी यांच्या मशालीवर कसे होईल, हेच लक्ष केंद्रित करून साळवी यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करायचे आहे, असे यशवंतराव म्हणाले. शिवसैनिकांची ताकद खूप मोठी आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी ही निवडणूक हातात घेतल्याने पुन्हा मतदारसंघात भगवा फडकणार, हा विश्वासही यशवंतराव यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 04/Nov/2024