रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेत कोकणातील पहिल्या ‘इनडोअर बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या मोहन खातू क्रीडा संकुलातील कोकणातील पहिल्या इंडोअर बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ सिनेनिर्माते नितीन वैद्य यांच्या हस्ते झाले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कोडचे उद्घाटन करण्यात आले. मोहन खातू हे नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील संस्थापक संचालक आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी सेक्रेटरी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. रत्नागिरीतील एस. एम. जोशी विद्यानिकेतन परिसरात उभारण्यात आलेले मोहन खातू क्रीडा संकुल हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पहिले इनडोअर बास्केटबॉल कोर्ट आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हे संकुल पूर्णत्वास आले आहे.

कोकणातील क्रीडा विश्वातून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कोर्टवर अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास श्री. हेगशेट्ये यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 04/Nov/2024