विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा (ता. शाहूवाडी) घाट उतरताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. रविवारी (दि.३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आंबा खिंडीजवळ अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व ट्रक मधील मालाचे आर्थिक नुकसान झाले. या अपघातामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. साखर व इतर माल घेऊन रत्नागिरीकडे जाताना घाटात ही घटना घडली.
चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था
देवाळे (ता.पन्हाळा) येथील सुतार यांचा ट्रक रत्नागिरी येथील डी.मार्टचा माल घेऊन आंबा घाटातून निघाला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी होताच चालक तेथून पसार झाला. घाटात कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावर खडी विखुरल्याने वाहन चालकास मोठी कसरत करावी लागते. ट्रक मध्येच पलटी झाल्याने तीन तास वाहतूक खंडीत झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 04/Nov/2024














