चिपळूण : महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

चिपळूण : चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाऊबीजच्या दिवशी सकाळी चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानला श्रीफळ अर्पण करून झाला.

यावेळी महाविकास आघाडीचे नेते बहुसंख्येने उपस्थित होते. सोमवारी प्रचारफेरी सुरू होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. यानंतर प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिपळूण ग्रामीण भागातील गाव भेट दौरा करून मतदारांशी संवाद साधला आहे. या दौऱ्याला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

तर भाऊबीजच्या दिवशी शहरातील प्रचार दौऱ्याचा शुभारंभ चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानला श्रीफळ अर्पण करून केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, माजी आमदार रमेश कदम, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, शिवसेना उबाठा पक्षाचे सहसंपर्कप्रमुख सचिन कदम, माजी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, माजी नगरसेवक मोहन मिरगल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहर प्रमुख शशिकांत मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, समन्वयक शिरीष काटकर, सचिन खरे, माजी नगरसेवक राजु भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक सतीश खेडेकर, माजी उपनगराध्यक्ष सुचय रेडीज, माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस, माजी नगरसेविका सौ. सुषमा कासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, शहराध्यक्षा डॉ. सौ. रेहमत जबले, कार्याध्यक्षा सौ. अंजली कदम, सौ. रुही खेडेकर, सौ. वैशाली शिंदे, सौ. रुमा देवळेकर, भिले सरपंच सौ. आदिती गुढेकर, माजी नगरसेविका सौ. सफा गोठे, नगरसेवक संजय रेडीज, सुरेश राऊत, हिंदुराव पवार,यशवंत फके, संदेश किंजळकर, महेश महाडिक, संतोष पवार आदी, उपस्थित होते.

प्रशांत यादव यांचा बहुमतांनी विजय निश्चित- रमेश कदम

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असून जोरदारपणे प्रचार सुरू आहे. राज्यात महागाई वाढली असून सर्वसामान्यांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. यासह अनेक प्रश्न आव्हानात्मक बनले आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने जनता उभी राहील. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा बहुमताने विजय होईल, असा विश्वास माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 04/Nov/2024