रत्नागिरी : लांजा तालुक्यातील दोन, संगमेश्वर तालुक्यातील एक व्यक्ती बेपत्ता झाली असून या व्यक्ती आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लांजा तालुक्यातील दोन व्यक्ती नापत्ता झाल्याची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गोविळ, गुरवगाव (ता. लांजा) येथील सरिता सीताराम गुरव (वय ६५) या दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेल्या असून त्यानंतर त्या घरी आल्या नाहीत. त्यांचे शिक्षण सातवी असून उंची ४ फूट ५ इंच, रंग निमगोरा, केस बारीक काळे-पांढरे, बांधा सडपातळ आहे. त्यांनी जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. हातात पिवळसर रंगाची एक बांगडी व पायात साधी स्लिपर होती. साई समर्थ रेसिडन्सी, एफ विंग, रूम क्रमांक १०३, ता. लांजा येथील वैभव चंद्रकांत चोरगे (वय ४२) हे दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले असून तेही बेपत्ता आहेत. त्यांचे शिक्षण बीसीए असून उंची ५ फूट ८ इंच, रंग सावळा, चेहरा उभट व केस काळे आहेत. त्यांनी फुल शर्ट, फुल पॅन्ट व ब्राऊन रंगाची सॅन्डल परिधान केली होती. हातात घड्याळ, गळ्यात चांदीची चेन होती. ते त्यांच्या मालकीच्या नॅनो कारने (क्र. एमएच ०४ एफझेड ०३३०) बाहेर पडले होते. त्यांच्याकडे एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला मोबाइलही होता. या दोन्ही व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अब्दुल साराफ शब्बीर हरचीकर, वय 21 वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. आंगवली, सोनारवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी हे दि. 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 0.45 वाजता सावर्डे रेल्वे स्थानकातून तुतारी एक्स्प्रेस गाडीमधून बेपत्ता झाले आहेत. या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 7620861800 या क्रमांकांवर रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 28-05-2026














