Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील नेत्यांनी बंडाचं निशाण उभारलं आहे.

त्यामुळे जवळजवळ सर्वच पक्षांची अडचण वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची (4 ऑक्टोबर) शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोणते बंडोबा थंड होणार? कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार? तर कोण निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार? हे स्पष्ट होणार आहे.

अनेक बड्या नेत्यांचे बंड, पक्षांची डोकेदुखी

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काही नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलंय, तर काही नेत्यांनी आम्हाला पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला असून कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. सध्या दिवळीचा सगळीकडे उत्सव आहे. दिवाळीत नेतेमंडळी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. मात्र यावेळच्या दिवाळीत वेगवेगळ्या पक्षांच्या शीर्ष नेतृत्त्वाकडून बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी कसरत चालू आहे. 3 तारखेपासून बडखोर नेत्यांशी चर्चा करून जमेल त्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न पक्षांकडून केला जातोय. या प्रयत्नांना यश येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 04-11-2024