मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा एक तास उरला आहे. त्याआधी महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी मविआकडून काय प्रयत्न सुरु आहेत
तसच शेकाप बरोबर काय ठरलय? त्याची माहिती दिली. “महाविकास आघाडीत बंडखोरी करणाऱ्या अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. काही अर्ज मागे घेण्यासाठी चालले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आता एक तासाने तीन वाजता मुदत संपेल. एक तासानंतर कोणी अर्ज मागे घेतले, कोणी नाही हे चित्र स्पष्ट होईल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोणी अर्ज मागे घेतले नसतील, तर नाइलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र, आमचा पूर्ण प्रयत्न आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहे. त्याबद्दल कुणाच दुमत नाही” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. “जे कोणी अपक्ष, बंडखोर उभे राहिलेत, त्यांना सूचना गेल्या आहेत. तीन वाजता चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढचं पाऊल टाकू. आम्ही सगळीकडे सूचना दिली आहे. अनेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शेकापला किती जागा सोडल्या?
शेतकरी कामगार पक्षासोबत झालेल्या चर्चेबद्दलही उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. “जयंत पाटील काल संजय राऊतांच्या भेटीला आले होते. माझ्याशी त्यांची फोनवरुन चर्चा झाली. उरणची जागा आम्ही लढवतोय. अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा शेतकरी कामगार पक्षाला दिली आहे. आमचे तिथले उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतली. तीन नंतर सर्व चित्र तुमच्यासमोर येईल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 04-11-2024