खेड : संगलट परिसरामध्ये बिबट्याची दहशत

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा भागातील संगलट परिसरामध्ये बिबट्या लोकवस्तीमध्ये घुसू लागल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार, दि. १ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. कुत्री ओरडत असताना काही जागरूक नागरिकांनी उठून पाहिले असता, बिबट्या कुत्र्याची शिकार करताना दिसून आला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या दिवाळी साजरी सुरू असताना नागरिक उशिरा झोपत आहेत. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी खेडचे वरिष्ठ वन अधिकारी सुरेश उपरे यांच्याकडे देखील कैफियत मांडून माहिती दिली आहे. सध्या अनेक ठिकाणी विनापरवाना जंगलतोड होत असल्याने वन्य प्राणी आता शिकारीसाठी लोक वस्तीमध्ये घुसू लागले आहेत. त्यामुळे आता लोक वस्तीतून घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तरी संबंधित बिबट्याचा त्वरित बंदोबस्त वन खात्याने करावे अशी मागणी संगलट गावचे सामाजिक कार्यकर्ते हमीद नाडकर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 05/Nov/2024