रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीतील शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांची कामगिरी कौतुकास्पद असून महायुतीचे सर्वच नेते मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत. अन्य उमेदवाराला सहकार्य असल्याचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ संदेशाद्वारे ना. फडणवीस यांनी हे आवाहन केले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआय महायुतीचे रत्नागिरीचे उमेदवार उदय सामंत यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत असून, त्यांनी सरकारमध्ये केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे सर्व नेते त्यांच्या पाठीशी आहेत. अनेक लोक संभ्रम पसरवत आहेत. आमचा सपोर्ट दुसऱ्या उमेदवाराला असल्याचे सांगत आहेत. फेक नरेटिव्हला संपवून टाका, असे सांगतानाच महायुतीचे सर्व नेते सामंत कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 06/Nov/2024














