गुहागर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शृंगारतळीत पोलिसांचा ‘रूट मार्च’

गुहागर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्याने आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता तसेच दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनखाली गुहागर पोलिस ठाण्याच्यावतीने शृंगारतळी बाजारपेठेत रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान व गुहागर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 06/Nov/2024