रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील गटारांवर असलेल्या अनधिकृत टपऱ्यांसह बांधकामांवर रत्नागिरी नगर परिषदेने लक्ष केंद्रीत केले आहे. काही टपऱ्या हटवून त्या जप्त केल्या जात असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना ते हटवण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यातील काही अनधिकृत बांधकामधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असताना अनधिकृत टपऱ्या, खोके वाढू लागले आहेत. अनधिकृत बांधकामेसुद्धा यापूर्वी झाली असून या संदर्भात कारवाई सुरू झाली आहे. अनधिकृत खोके हटवून जप्त केले जात आहेत.
गटारांवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासंदर्भात अनेकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यातील काहीजण न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी अशी अनधिकृत बांधकामे पोलिस बंदोबस्तात पाडून टाकण्याबाबत कार्यवाही केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 06/Nov/2024














