रत्नागिरी : मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयातील प्राचार्या स्नेहा पालये यांना राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक पुरस्कार

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय चाफेमधील प्रभारी प्राचार्या चाफेमधील स्नेहा पालये यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यातर्फे धर्मनाथ भवन बेळगाव येथे गौरवण्यात आले.

हा पुरस्कार इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीची बेळगावी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि) बेळगावी हेल्थ अॅड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगावी (दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा) या राष्ट्रीयकृत संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

चाफे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये यांना हा यावर्षीचा बहुमान मिळाला आहे. प्राचार्या स्नेहा पालये या चाफे महाविद्यालयात गेली अनेक वर्षे अध्यापनाबरोबर कॉलेज व्यवस्थापनाचे काम करत आहेत. हुशार आणि शिस्त प्रिय अशी त्यांची ओळख आहे.

पालये यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, कार्याध्यक्ष आणि सचिव रोहित मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, खजिनदार ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचीवले यांसह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 06/Nov/2024