ओम शिंदे याची तायक्वाँदो जिल्हा तांत्रिक प्रमुखपदी निवड

खेड : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सोबत संलग्न असलेल्या तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये तायक्वाँदो खेळाच्या प्रतिनिधींची यादी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे दिली असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील तरुण खेळाडू ओम शिंदे याची जिल्ह्याच्या तायक्वाँदो तांत्रिक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ मार्शल आर्ट प्रशिक्षक कोकणरत्न पुरस्कार प्राप्त स्व. सुनील शिंदे यांचा ओम शिंदे हा मुलगा आहे. खेड येथील ज्ञानदीप फार्मसी कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. तायक्वाँदो सोबतच पिंचाक सिलाट या सारख्या अनेक मार्शल आर्ट ओम याला अवगत असून, त्या खेळांमध्ये जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत त्याने यश मिळवले आहे. राज्य तायक्वाँदो संघटना अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी त्याचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 06/Nov/2024