चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात झालेली विकासकामे आणि त्याच्या जोडीला शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांची असलेली साथ, यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा दीडपट मताधिक्य असेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी पोफळी येथील सभेत व्यक्त केला.
या सभेच्या माध्यमातून पोफळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. यावेळी सामंत म्हणाले, महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी गेल्या वर्षात ज्या पद्धतीने चिपळूण-संगमेश्वरवासीयांची सेवा केली आहे ते पाहता मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब काम मानून काम केलं आहे. तुम्ही केलेली कामे पाहता विजय तुमचा निश्चित आहे.
माजी आमदार चव्हाण म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे. यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह वसंत ताम्हणकर, शौकत मुकादम, जयंद्रथ खताते, दादा साळवी बाबू साळवी, नितीन ठसाळे दिशा दाभोळकर, सुरेखा खेराडे, जयंतराव शिंदे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 06/Nov/2024














