नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय कलम केले जातील; नारायण राणेंचा इशारा

सिंधुदुर्ग : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होत आहे. मात्र, मनसे, वंचित, एमआयएम (MIM) आणि परिवर्तन शक्तीच्या माध्यमातून इतर नेतेमंडळीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार दिला असून अकबरुद्दी ओवैसी यांनी नासिर सिद्दिकी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत बोलताना सिद्दिकी यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. नितेश राणेंचं नाव न घेता त्यांना विधानसभेत घुसून मारू, अशा शब्दात त्यांनी धमकी दिली आहे. एक पाच फूट, 5 रुपयावाला पेप्सी मशिदीत घुसून मारू, अशी भाषा करतो, एवढी हिंमत वाढलीय. पण मी तुम्हाला सांगतो विधानसभेत घुसूर मारण्याची ताकद ठेवतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता थेट केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) पलटवार केला आहे.

नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांत हिंदू जनजागरण रॅली व मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभष भाषण केल्यामुळे मुस्लीम समाजाचा रोष त्यांच्याबद्दल वाढला आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी त्याच भाषणांचा संदर्भ देत भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. नितेश राणे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष विधानसभेत घुसून मारू, असं सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अमखास मैदानावर अकबर ओवेसी यांची मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलतांना सिद्दीकी यांनी हे वक्तव्य केले. त्यावरुन, आता राजकीय वाद पेटला असून नासिर सिद्दिकी यांच्या वक्तव्यावर थेट माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणेंनी पलटवार केलाय. नारायण राणेंनी जशात तसे उत्तर देत नितेश राणे आणि हिंदूंविरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील, अशा शब्दात इशारा दिला आहे. त्यामुळे, एमआयएम आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांवरुन जुंपली आहे.

एम्आयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदूंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती. निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लांगुलचालन करणाऱ्यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे आणि हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील. अशी पोस्ट सोशल मीडियावर नारायण राणे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 06-11-2024