बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे.
शाहरुख खानला मिळालेल्या धमकी प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी धमकीचा फोन आला होता, यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेस केला असून पुढील तपास सुरु आहे.
सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकी आली आहेत. अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फैजानने शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी धमकीचा कॉल ट्रेस करत त्याची लोकेशन शोधली. यामध्ये ही व्यक्ती छत्तीसगडमधील रायपूर येथील असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांचं एक पथक रायपूरला रवाना
सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यानंतर आता पोलिसांचे एक पथक रायपूरला रवाना झालं आहे. पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 308(4) आणि 351(3)(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कसून तपास सुरु असून आरोपींना लवकरच पकडलं जाईल, असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या धमकीच्या फोननंतर फिल्म इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. याआधीही सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमानला सातत्याने धमक्या येत आहेत. गेल्या महिन्यात सलमानचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. आता पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 07-11-2024