Ratnagiri Draft Voter List 2026: रत्नागिरी जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध; उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची माहिती

रत्नागिरी:

रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही यादी जाहीर करण्यात आली असून, यावर दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.

यादी कुठे पाहता येईल?

प्रारूप मतदार यादी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय मतदारांना खालील अधिकृत संकेतस्थळांवरही आपले नाव तपासता येईल:

  • भारत निवडणूक आयोग: eci.gov.in
  • मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र: ceoelection.maharashtra.gov.in
  • जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी: ratnagiri.gov.in

नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा पत्ता बदलासाठी अर्ज

  • नवीन नाव नोंदणी: नमुना क्र. ६ (Form 6)
  • परदेशी मतदारांसाठी: नमुना क्र. ६-ए (Form 6A)
  • नाव वगळण्यासाठी किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी: नमुना क्र. ७ (Form 7)
  • नोंदीतील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा दिव्यांग नोंद: नमुना क्र. ८ (Form 8)

हे सर्व अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त Voter Helpline App वरूनही अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासून आवश्यकतेनुसार मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 01-09-2026