राज्यात तापमानात घसरण..

पुणे : राज्यात थंडी हळूहळू पाय पसरू लागली आहे. परिणामी, किमान तापमानातदेखील घसरण झाली आहे. त्यामुळे सकाळी धुके तसेच रात्री थंडी चांगलीच जाणवू लागली आहे.

नोव्हेंबर महिना सुरू होताच ऑक्टोबर हीटचा तडाखा कमी झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात दाणा चक्रीवादळ तयार झाले होते. त्या वादळामुळे दक्षिण भारताकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले, त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र उत्तर भारताकडून थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे. यामुळे थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांचा किमान तापमानाचा पारा २० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे, त्यामुळे थंडी सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 08-11-2024