कन्नड : महाराष्ट्रात सर्वत्र चिखल पसरला, कमळ यावे म्हणून सगळा चिखल केलाय, आणि हा चिखल आपल्याला साफ करायचा आहे, अडीच वर्षांपूर्वी आपलं सरकार पडल्यानंतर भाजप राज्याची लूट करीत आहे.
घटनाबाह्य आणि अवकाळी सरकार जनतेच्या डोक्यावर बसवलय, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
‘निवडणूक आयोगाला अधिकार नाही की आपलं चिन्ह चोरून गद्दारांना द्यायचा, मात्र निवडणूक आयोगाने तो दिला, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा काढलेला फोटो तो एकनाथ शिंदे यांनी चोरला असल्याचेही ठाकरे म्हणाले.
महविकास आघाडीचे कन्नड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारासाठी गुरुवारी कन्नड येथे सभा पार पडली . यावेळी प्रचार सभेची सुरुवात आपल्या मतदार संघात करतोय, इथून प्रचाराची ही पहिली सभा आहे, आणि आपलं सरकार आल्यावर या उमेदवाराची मला गरज पडणार आहे . असं आदित्य आवाहन आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलं.
राज्यातलं सरकार केवळ घोषणा करण्यात मग्न आणि लूट करण्यात व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली तसचं यावेळी बोलताना ते म्हणाले की ‘या सरकारने घोषणा केलेले एकही महामंडळ टिकले नाही. उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून निर्णय घेतले . तेव्हा सगळे अधिकारी हादरले होते. लोकांमध्ये खळबळ निर्माण करणारे निर्णय घेतले होते. हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत . दोन वर्षात अनेक वाद निर्माण झाले. भाजपचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे नाही तर घर पेटवणारे आहे, आपले हिंदुत्व तोंडात राम हाताला काम असल्याचं म्हणतानाच आपल्याला भाजप आणि एकनाथ शिंदे सारखे गद्दार अडवू शकत नाही, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
ठाकरे म्हणाले की ‘माफी गुन्हेगाराला असते, शेतकरी हा गुन्हेगार नाही. आपण कुठे त्यांना माफ करणार ? ते आपले अन्नदाते आहेत. दोन वर्षात आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलो. दुष्काळ, गारपीट,जिथं जिथं अडचण आहे तिथं गेलो आहोत. आमच्या हातात सरकार आणि यंत्रणा नव्हती मात्र विश्वास होता. मागील महिन्यात बीडमध्ये आपण फिरत होतो, म्हणून मुख्यमंत्री तिथं फिरत होते आणि केवळ फोटो काढत होते. आणि कृषिमंत्री कधी पाहिले आहेत का ? आधी कृषिमंत्री अब्दुल गद्दार होते. इथे कापसाला आणि सोयाबीन पिकाला भाव नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या कडून आधार देणारे कुणी नाही. सत्तेत बसलेले माजलेले आहेत. हे खोकेवाले धोके देत आहेत. पण २३ तारखेला सरकार बदलणार हा मी शब्द देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 08-11-2024