लांजा पोलिसांकडून ३१ हजार ५०० रुपयांचा गावठी हातभट्टीचा दारूसाठा जप्त

लांजा : विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी धाड टाकून ३१ हजार ५०० रुपयांच्या गावठी हातभट्टीच्या दारूसाठ्यासह एकाला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई शुक्रवारी सकाळी ७.१० वाजता भांबेड पवारवाडी येथे करण्यात आली.

तालुक्यातील भांबेड येथे एक जण बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी आज शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१० च्या सुमारास भांबेड पवारवाडी येथील मांजरांना येथील बाजुच्या बागेत व लवेश रघुनाथ पवार यांच्या घराजवळील मोकळ्या पडवीत

धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे १५ कॅन यामध्ये प्रत्येकी २० लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. तीची किंमत ३१ हजार ५०० रुपये इतकी असून हा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी लवेश रघुनाथ पवार (वय ४७, भांबेड पवारवाडी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 09-11-2024