Court Order Dispute Sangameshwar: न्यायालयीय आदेश डावलून खाजगी जागेत रस्ता केल्याचा आरोप; तहसीलदार, गटविकास अधिकारी व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

भडकंबा-पेठवाडी येथील घटना; कोणतीही पूर्वसूचना न देता १० फूट रुंदीचा रस्ता तयार केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

संगमेश्वर:

Court Order Dispute Sangameshwar प्रकरणाची माहिती समोर आली असून, तालुक्यातील भडकंबा-पेठवाडी येथे खाजगी मिळकतीत न्यायालयीय आदेश अस्तित्वात असताना कोणतीही पूर्वसूचना न देता १० फूट रुंदीचा रस्ता तयार केल्याचा गंभीर आरोप दीपक नथुराम लाड व शंकर नथुराम लाड यांनी केला आहे. या प्रकरणी देवळुरुचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, तसेच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवाणी न्यायालयातील दावा आणि न्यायालयीन आदेश

लाड यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक १०८ मधील मिळकतीबाबत २०१३ मध्ये दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. २ सप्टेंबर २०२३ रोजी हा दावा त्यांच्या बाजूने निकाली निघाला असून, या आदेशाची प्रत संबंधित शासकीय कार्यालयाना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. हमीद रमदुल व खतीजाबी रमदुल यांच्या तक्रारीवरून ५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाने कारवाई केली. यावेळी कोणतीही लेखी पूर्वसूचना दिली नाही, तसेच आदेशाची प्रतही दाखवली नाही, असा आरोप लाड यांनी केला आहे. त्यांच्या खाजगी मिळकतीत अतिक्रमण करून भातशेती, बांबू आणि कुंपणाचे नुकसान केल्याचे निवेदनात नमूद आहे.

प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गट क्रमांक १३६० मध्ये पाखाडीची नोंद भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेखात आढळत नसल्याचे ३० जानेवारी २०२६ च्या पात्रात नमूद असल्याचे दावा लाड यांनी केला आहे. तसेच ११ नोव्हेंबर २०२५ च्या पात्रात न्यायालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर ५ ऑक्टोबरला कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची कागदपत्रे व न्यायालयीन आदेश तपासून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, मिळळक पूर्ववत करावी आणि ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणातील आरोपांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका समजू शकलेली नाही, असा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे.

Tata aeris