जंतरमंतर २.० आंदोलनापूर्वी दिल्लीत खळबळ; विमान लँडिंग होताच पोलिसांनी थेट विमानामध्ये शिरून नेत्यांना घेतले ताब्यात
नवी दिल्ली:
Abhijeet Dipke CJP Delhi Arrest च्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज ‘सीजेपी’कडूल जंतरमंतर २.० ची घोषणा झाल्यानंतर अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतरमंतरवर आंदोलन करणारच असा निर्धार सीजेपीकडून (कॉकरोच जनता पक्ष) करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच मुंबईतून दिल्लीकडे प्रस्थान केलेल्या अभिजीत दिपके, प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी थेट विमानामध्ये घुसून ताब्यात घेतले आहे. विमान लँडिंग करण्यापूर्वीच विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवून ही कारवाई करण्यात आली असून, ही आणीबाणी आणि हुकूमशाही असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.
विमानातील कारवाई आणि प्रवाशांची तारांबळ
- इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे उघड: पोलिसांनी विमानामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्राम लाईव्ह करत पोलीस अटकेसाठी आल्याचे दाखवले होते.
- महिला पोलिसांचा सहभाग: अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून महिला पोलिसांचे पथक पाठवण्यात आले होते.
- प्रवाशांची तारांबळ: पोलीस अचानक विमानामध्ये घुसल्यामुळे इतर प्रवाशांची देखील एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. “आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत, अशा पद्धतीने ताब्यात घेणे बरोबर नाही,” असे म्हणत असतानाच महिला पोलीस पथकाने त्यांना विनवणी करत ताब्यात घेतले.
दिल्लीतील छावणीचे स्वरूप आणि इतर नेत्यांवर कारवाई
ध्रुव राठी व रत्ना सिंह ताबाडीत: दिल्लीत आंदोलनासाठी पोहोचलेले युट्यूबर ध्रुव राठी यांना गुरुग्राममधील घरातून साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सीजेपीच्या लीगल टीमच्या हेड रत्ना सिंह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभूतपूर्व सुरक्षा: दिल्लीमध्ये जवळपास ३८ ते ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उतरवण्यात आला असून सीमा सुरक्षा करणारे जवान शस्त्रधारी झाले आहेत. जंतरमंतरवर पोहोचणाऱ्या ‘जेन-झी’ (Gen Z) तरुणांनाही पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे.
रस्त्यांवर केवळ पोलीसच दिसत असून, दिल्लीतील ही परिस्थिती कोरोना काळातील लॉकडाऊनसारखी भासत असल्याचे व्हायरल झालेला व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 10-10-2026














