रत्नागिरी : पावसाचा वेग मंदावल्यावर आता पुन्हा एकदा रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात होत आहे. शहरातील मारुती मंदिर ते माळ नाका या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला उद्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे. यामुळे माळ नाका ते मारुती मंदिर या रस्त्यावर उद्यापासून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.
मारुती मंदिर वरील भागातील कॉंक्रिटीकरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मध्यंतरी पावसामुळे हे काम थांबवण्यात आले होते. साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज हा संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण होणार आहे. त्यामुळे दरवर्षी रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 24-09-2024